ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार आनंदी मैत्री प्रतिष्ठान चिंचवड व चाकण येथील L S ऑटोमोटिव्हचा संयुक्त उपक्रम

पुणे प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आनंदी मैत्री प्रतिष्ठान आणि LS ऑटोमोटिव्ह चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय साहित्य व फर्निचरचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आसखेड बुद्रुक (खेड) तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेश खिंड (खेड) येथे विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
आनंदी मैत्री प्रतिष्ठान ही संस्था ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. “सांगा, तुम्ही मदतीसाठी सदैव तत्पर आम्ही” या ब्रिद वाक्याप्रमाणे संस्था जिथे गरज आहे तिथे पोहोचून मदतीचे कार्य करते. या उपक्रमासाठी LS ऑटोमोटिव्ह चाकण येथील कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास आनंदी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश लुंकड, सचिव योगिता लुंकड, LS ऑटोमोटिव्ह चे फायनान्स हेड हिमांशू सामंतसर, LS ऑटोमोटिव्ह कंपनीचे HR हेड श्री. प्रसाद दीक्षितसर, खेड प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री सोमनाथ पाचपुतेसर, तसेच सरूजी कुलकर्णी, शलाका कोरघडे आणि जालिंदर पाचपूते व सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षकांनी केले, तर शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
यावेळी आनंदी मैत्री प्रतिष्ठानतर्फे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सुमारे १,००० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शालेय साहित्य देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाची ही सुरुवात असून, पुढील काळातही हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


