Monday, April 27, 2026
Latest:
करमाळा

मानवाधिकार संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेशकुमार मुथ्था यांची निवड

करमाळा प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (ह्यूमन राइट्स) च्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेशकुमार हुकुमचंद मुथा यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे व महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे 
करमाळा तालुक्यात सामाजिक व मानवाधिकार विषयांवर कार्यरत असलेल्या मुथा यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर संघटनेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे संघटनेच्या धोरणानुसार तालुक्यातील नागरिकांचे हक्काचे संरक्षण, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि विविध प्रश्नांवर जनजागृती करणे यावर  भर दिला देणार आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दिनेशकुमार मुथा यांनी सांगितले की, संघटनेच्या नियमांचे पालन करत पारदर्शक व जबाबदारीने काम करणार असून, करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे  युवकांना मानवाधिकार विषयक जागरूक करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, दिनेश कुमार मुथा यांच्या निवडीचे करमाळा तालुक्यासह संघटनेच्या राज्य व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!