करमाळासकारात्मक

करमाळा महावितरणच्यावतीने ग्राहंकासाठी एक गाव एक दिवस या योजनेचे आयोजन*

करमाळा प्रतिनिधी करमाळा महावितरणच्यावतीने स्वातंत्र्याची 75 वर्ष अमृतमहोत्सव वर्षानिमित्त मा. सुनील पावडे साहेब मुख्य अभियंता बारामती यांच्या संकल्पनेतून तसेच अधीक्षक अभियंता आदरणीय संतोष सांगळे सर यांच्या अधिपत्याखली शाखा कार्यालय करमाळा ग्रामीण दोन मधील ,कोर्टी वीट ,मांगी ,गावात दिनांक ७ऑगस्ट ते ९ ऑगस्ट, हे तीन दिवस महावितरण तर्फे”एक गाव एक दिवस” योजनेचे आयोजन करण्यात आले आहे, त्या दरम्यान
१. विज बिल दुरुस्ती व वसुली
२.नवीन वीज जोडण्या
३. विलासराव देशमुख योजनेअंतर्गत PD To रीकनेक्शन
४. ग्राहकाचे फॉल्टी मीटर बदलणे ५.वीज चोरी पकडणे
६. पडलेली लाईन दुरुस्ती करणे, इत्यादी कामे करण्यात येणार आहेत
याच प्रमाणे तालुक्यातील लघु सबस्टेशन मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, यासाठी
बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कुराडे साहेब, मार्गदर्शनाखाली करमाळा उपविभागाचे सुमित जाधव साहेब उप कार्यकारी अभियंता यांच्यासोबत, शाखा अभियंता सुनील पवार साहेब यांनी व सर्व लाईनमन, मेंटेनन्स चे एजन्सी नितीन इंजिनियर्स उनिसोर्स एजन्सी यांचे ही सहभाग राहील, तरी सर्व महावितरण कंपनीचे ग्राहकाने या योजनेचा जस्तित् जास्त् लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group