आठ ते दहा फेब्रुवारी २०२३ रोजी करमाळ्यात धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवल!!!! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
सिनेस्टार क्रांती मुळेगावकर यांच्या प्रसिद्ध होम मिनिस्टर या कार्यक्रमासह तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याशिवाय मोफत आरोग्य शिबिर व औषधाचे वाटप तीन दिवस करण्यात येणार आहेअशी माहिती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहेआठ तारखेला राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धावय 14 पर्यंत तीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहेत.9तारखेला सोलो डान्स स्पर्धा होणार असून दहा तारखेला महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या क्रांतीमुळे गावकर यांचा होम मिनिस्टर च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी पाच हजारापासून ते 51 हजार पर्यंतचे बक्षिसे ठेवण्यात आले आहेत शिवाय फ्रिज पैठणी सहभागी होणाऱ्या महिलांना गिफ्ट वस्तू देण्यात येणार आहेतआठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान धर्मवीर आनंद दिघे सभा मंडपात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रुग्णांना मोफत औषधाचे वाटप करून देण्यात येणार आहे रुग्णांवर सर्जरी व उपचाराची गरज आहे मुलांना मोफत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे सर्जरी करून देण्यात येणार आहे.या शिबिरासाठी बुधरानी हॉस्पिटल पुणे जुपिटर हॉस्पिटल मुंबई आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सह 40 डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेतडायबिटीस पासून हृदयरोगापर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे चिरंजीव रुद्रांश शिंदे संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी चाळीस हजार चौरस फुटाचा प्रचंड मंडप टाकून सेट उभा करण्यात आला आहेे.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खाजगी शाळा यामधील विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आव्हान आयोजकातर्फे करण्यात आले आहे.राज्यस्तरीय सोलो डान्स स्पर्धेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक येणार आहेतक्रांतीमुळे गावकर यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी केवळ महिलांनाच प्रवेश देण्यात येणार मुख्यमंत्री सहायता कक्षाची कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखालीउपजिल्हाप्रमुख अनिल पाटील युवा सेनेचे निखिल चांदगुडे विशाल गायकवाड देवानंद बागल संजय शीलवंत रोहित वायबसे नागेश शेंडगे नागेश गुरव जयराज सोनू चिवटे प्रियंका गायकवाड राहुल कानगुडे सुधीर आवटे वैभव मावळकर प्रशांत नेटके काका जगताप दादा थोरात निलेश चव्हाण वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष प्रमुख दीपक पाटणे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते एडवोकेट शिरीष लोणकर आधी जण परिश्रम घेत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सत्य बंधू प्रकाश शिंदे
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत वाकावचे सरपंच पृथ्वीराज सावंत भैरवनाथ शुगरचे संचालक ऋतुराज सावंत भैरवनाथ शुगर संचालक किरण तात्या सावंत
पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार !!!!