जिल्हास्तरीय १९ वर्ष वयोगटातील कब्बडी स्पर्धेसाठी दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ च्या मुलींची निवड
करमाळा प्रतिनिधी जिल्हास्तरीय १९ वर्ष वयोगटातील कब्बडी स्पर्धेसाठी दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड न्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ च्या मुलींची निवड झाली आहे.
गौंडरे या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२३-२०२४ या स्पर्धेत दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज केत्तुर नं१ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्यात अंतिम सामना झाला. दत्तकला आयडियल स्कूलच्या खेळाडूंनी ५ गुणासह अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड प्राप्त केली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामदास झोळ सर, उपअध्यक्ष राणा (दादा) सुर्यवंशी साहेब सचिवा सौ. माया झोळ मॅडम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर सर, स्कूल डायरेक्टर सौ.नंदा ताटे मॅडम, स्कूलचे प्राचार्य श्री.विजय मारकड सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
