पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी मोक्यातील बारा वर्षापासून फरार आरोपीस अटक
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दमदार कामगिरी करत मोक्यातील बारा वर्षापासून फरार आरोपीस अटक केली असून यावेळी आरोपीच्या नातेवाईकानी पोलीस पथकावर काठी – दगडाने हल्ला केल्याने दोन पोलीस जखमी झाले आहेत.
सोमनाथ जगताप वय ३० व मनीष पवार वय ४१ असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नावे असून त्यांच्यावर करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
यामध्ये रविंद्र उर्फ चंगाळया हाड्या उर्फ हरी भोसले, वय ४० वर्षे रा. मलवडी, ता. करमाळा, जि. सोलापूर असे मोका लागलेल्या व तब्बल बारा वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला जेर बंद करताना करमाळा पोलिसावर आरोपीची आई काली भोसले व बायको सारिका भोसले या दोन महिलांनी पोलीसावर जोरदार दगडफेक करून काठीने हल्ला केला होता. यावेळी दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. हा प्रकार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी रवींद्र उर्फ चंगाळ्या भोसले यांच्या घरा जवळ घडला होता.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मनिष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे, तसेच सायबर पोलीस व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.
याबाबतची हकीकत आशी की ,
दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे जेऊर तालुका करमाळा येथील महादेव नगर मध्ये सचिन शिंदे यांच्या घरी जबरी दरोडा पडला होता. यावेळी
सचिन गोरख शिंदे यांचे घराचा दरवाजा उचकटुन घरात प्रवेश करून संशयित आरोपी बतुल्या काळे व इतर अज्ञात चोरटयांनी कोयत्याचा धाक दाखवुन जिवंत मारण्याची धमकी दाखवुन जबरदस्तीने तब्बल ९३ हजाराची लूट केली होती यामध्ये १० हजार ३०० रुपयांची रोख रक्कम, ७ हजार-रु. चा मोबाईल,१२ हजार रुपयांची र एक गळयातील सोन्याचे ४ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र,१२ हजार रुपयांचे कानातील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची फुले, १ हजार रु. चा मोबाईल , ३९ हजार रु.ची एक गळयातील सोन्याचे १३ ग्रॅम वजनाचे गंठण, १२ हजार रु कानातील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची फुले असा एकूण एकुण ९३ हजार ३०० रु. किंमतीचा ऐवज लुटून नेला होता. करमाळा पोलिसात या प्रकरणी गुरनं. भा.द.वि.क. ३९२,४५२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान भादवी कलम ३९५ सह मोका क. ३ (१) (1) (1), ३(२), ३(४) प्रमाणे कलम वाढ करण्यात आली होती सदर गुन्हयात प्रथम बतुल्या काळे व त्यानंतर रविंद्र उर्फ चंगाळया हाड्या उर्फ हरी भोसले, वय ४० वर्षे रा. मलवडी, ता. करमाळा, जि. सोलापूर हा निष्पन्न झाला होता. त्यास वारंवार अटक करण्याचे प्रयत्न झाले होते परंतु तो पोलीसांना गुंगारा देवून फरार होत होता.
सदर घटनेचाअनुषंगाने गुन्हयाचा तांत्रीक तपास करुन तसेच गोपनीय बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी एक पथक तयार करुन सदर आरोपीबाबत योग्य त्या सुचना देवून तपासावर पाठवले होते. यावेळी आरोपी रविंद्र उर्फ चंगाळया हाड्या उर्फ हरी भोसले, वय ४० वर्षे रा. मलवडी, ता. करमाळा, जि. सोलापूर यास पोलीस पथक यांनी सापळा रचून अत्यंत शिताफीने ताब्यात घेत असताना आरोपी चंगाळया याने व त्याचे नातेवाईक यांनी त्यास अटक करता येवू नये याकरीता पोलीस पथकावर हल्ला केला. त्यामध्ये दोन पोलीस जखमी झाले .तरी देखील पोलीस पथकाने चंगाळया यास अत्यंत चतूराईने धाडसाने ताब्यात घेतले.
आरोपी चंगाळया उर्फ रविंद्र भोसले याचेवर ०६ अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो अदयाप पर्यंत पोलीसांना वारंवार गुंगारा देवून तो फरारी होता. त्याच्यावर करमाळा, टेंभुर्णी, कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांकडे विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल झालेले आहेत.
**
