जनसेवा हिच खरी ईश्वरसेवा मानुन आपण काम केले असुन स्वच्छता मोहिमेसारखे सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करा- वैभवराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी जनसेवा हिच खरी ईश्वरसेवा मानुन काम केले असुन स्वच्छता मोहिमेसारखे सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन शिवसेना नेते मा.नगराध्यक्ष नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करमाळा शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन या अभियानाचे उद्घाटन बुधवार, दिनांक२३ ॲागष्ट २०२३ रोजी एस.टी. स्टॅन्ड करमाळा येथे पत्रकार बांधवाच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात पत्रकार बांधवाचा हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या समाजव्यवस्थेत समाजकारणापेक्षा राजकारण करण्याकडे युवा पिढीचा कल असुन समाजसेवा हिच खरी ईश्वरसेवा मानुन आजपर्यत काम केले असुन महास्वच्छता मोहिम राबवुन सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्याचा स्वच्छ सुंदर करमाळा करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले आहे या .यावेळी पुढे बोलताना वैभवराजे जगताप म्हणाले की, जनसेवेचा वारसा माझे आजोबा कै.नामदेवराव जगताप आणि माझे वडील जयवंतराव जगताप यांच्याकडून मिळालेला आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त इतर अवास्तव गोष्टी टाळून करमाळा शहर स्वच्छ करण्याचे ठरवले आहे.त्यासाठी शहर स्वच्छतेला प्राधान्य देऊन हे अभियान सुरु केले आहे.येत्या काही दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ केले जाईल यासाठी शहरवासियांनी या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,अस्लम वस्ताद कुरेशी नजीर अहमद कुरेशी, प्रशांत ढाळे, ॲड नवनाथ राखुंडे,डाॅ.मनोज कुंभार, श्रेणीक खाटेर, अमोल परदेशी, बाळासाहेब बलदोटा सुनिल ढाणे, गणेश कुकडे, जोतिराम ढाणे ,बाळासाहेब कांबळे, युवा सेनेचे मयुर यादव, समीर हलवाई, दादा धाकतोडे,वंचित बहुजन आघाडीचे पप्पू लोंढे ,संभाजी होनप, जगदिश परदेशी, रोहिदास आल्हाट हे मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरबाज लालू घोडके,ओंकार आल्हाट,तानाजी कुकडे,उत्तम कांबळे, अमीर घोडके ,अक्षय जाधव, केतन इंदूरे ,सुशांत इंदुरे ,अतुल देवकर, सर्जेराव मांगले ,सूरज इंदुरे, बाळासाहेब इंदुरे, विनोद कुकडे ,कुमार माने,रणवीर परदेशी, फिरोज काझी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


