कवी दादासाहेब पिसे यांच्या “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा उद्या प्रकाशन सोहळा
करमाळा / प्रतिनिधी :
करमाळा येथील कवी श्री दादासाहेब सुभाष पिसे यांच्या “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक१७/०९/२३,रोजी विजयश्री सभागृह यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे सुप्रसिद्ध कवी मा.प्रा.डॉ. सुरेशजी शिंदे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला “प्रेमाचा जांगडगुत्ता” फेम सुप्रसिद्ध कवी मा.श्री. नारायण पुरी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून या कार्यक्रमासाठी “कडवान” कार सुप्रसिद्ध कवी मा.श्री.प्रकाश(तात्या)लावंड यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव मा.श्री विलासरावजी घुमरे सर तसेच विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा.श्री मिलिंद फंड सर त्याचप्रमाणे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.श्री.गणेश करे- पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील काव्यरसिकांनी या प्रकाशन सोहळ्याचा व लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक करमाळा तालुका साहित्य मंडळ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या वतीने करण्यात येत आहे