Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा शहराध्यक्षपदी सोहेल पठाण शहर कार्याध्यक्षपदी रामा कारंडे यांची निवड

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा शहरअध्यक्ष पदी बाहेर तालीम, छत्रपती चौक,करमाळा येथील श्री सोहेल अब्दुलकदार पठाण यांची तर शहर कार्याध्यक्ष पदी रंभापूरा येथील श्री श्रीराम (रामा)सुंदर कारंडे यांची आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी निवड जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजची निवड करण्यात आली. करमाळा तालुक्याचे आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या विचाराने या पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे नुतन शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी सांगितले. या निवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सोलापूर येथे जाहीर करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे- पाटील, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, राजेंद्र हजारे, करमाळा तालुका अध्यक्ष भरत आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, युवा नेते बाप्पू तांबे यांच्यासह जिल्ह्यातील व करमाळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group