Wednesday, April 23, 2025
Latest:
Uncategorized

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या ६ फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त टिपक्याची रांगोळी फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ होम मिनिस्टर कार्यक्रम

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त सहा फेब्रुवारी रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये टिपक्याची रांगोळी मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर उर्फ अप्पू उपस्थित राहणार आहे. तसेच आर जे अक्षय प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित केलेला आहे . महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन महिला भगिनींसाठी गोष्टी रंजक खेळ मराठी हिंदी गाण्याचं कॉमेडीचा तडाका आणि शेकडो आकर्षक बक्षीस पैठणी साडीचा खेळ रंगणार असून होम मिनिस्टर कार्यक्रम मध्ये सहभागी होणाऱ्या महिला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून विजेता महिला भगिनीस प्रथम बक्षीस एलईडी टीव्ही द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन तिथे बक्षीस मिनी आटा चक्की उत्तेजनार्थ देण्यात येणार असून महिला भगिनींनसाठी हा कार्यक्रम विना शुल्क ठेवण्यात आला आहे.कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय क्रीडांगण येथे होणार असून महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आवाहन असे आवाहन यशवंत परिवार विलासराव घुमरे सर परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group