उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्य करमाळा तालुक्यातुन दोनशे गाड्या जाणार – भरत भाऊ आवताडे
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची व आनंदाची वातावरण असून करमाळा तालुक्यतुन दिडशे गाड्यांचे नियोजन केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी करमाळा तालुक्यातील 118 गावांमधून दोनशे गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरतभाऊ आवताडे यांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्यानंतर युवकांचे आशास्थानप्रेरणास्थान अजित दादा प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असून सोलापूर जिल्हा कार्यालय उद्घाटन कार्यकर्त्याची संवाद व मार्गदर्शन करण्यासाठी येत असल्याने करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असून अजित दादा पवार यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेण्यास कार्यकर्ते उत्सुक आहेत.आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष आमदार असून अजित दादा पवार यांचे समर्थक असल्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये त्यांनी चांगले विकास काम केले आहे. त्यांच्या कामाच्या पोचपावतीमुळे आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष म्हणून आपण काम करत आहे गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा उभा करून संपूर्ण करमाळा तालुका राष्ट्रवादी मय करणार असल्याचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्याचे संवाद भेटी मेळाव्यासाठी जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड कार्याध्यक्ष सुजित बागल प्रांतिक सदस्य तानाजी बापू झोळ, बाळकृष्ण सोनवणे, चंद्रहास बापू निमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये करणार आहे .करमाळा तालुक्यातुन दोनशे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.