Uncategorized

आदिनाथला मामांसारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज. राजकुमार देशमुख राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, सोलापूर यांचे प्रतिपादन.


करमाळा प्रतिनिधी.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रण धुमाळी उठली आहे, अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र या आधी तालुक्यातील प्रत्येक नेत्याने कारखान्यावर आपली सत्ता स्थापना केली मात्र एकालाही सभासद, शेतकरी आणि कारखाना यांना न्याय देता आला नाही.एखादी संस्था, कारखाना चालवण्यासाठी अनुभव आणि त्या त्या परिस्थिती नुसार निर्णय घेण्याची क्षमता लागते आणि ती माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडे आहे. त्यांच्या कामाचा परिचय तालुक्याला गेल्या पाच वर्षात आलेला आहे त्यामुळे आता लोकांनी डोळसपने या निवडणुकीकडे बघावं, मागील विधानसभा वेळी झालेली चूक सुधारून घ्यावी असे प्रतिपादन राजकुमार देशमुख (राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, सोलापूर ) यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी करमाळ्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर आवाहन केले होते की संजयमामा ला निवडून द्या कारखाना जागेवर आणतो कारण दादा मामाचे सलोख्या चे संबधं सगळ्यांना माहित आहेत आणि याच गोष्टीचा फायदा कारखाना पूर्वपदावर आणायला होणार आहे.त्यामुळे मामांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आदिनाथ बचाव पॅनल ला निवडून आणण्याचे आवाहन राजकुमार देशमुख यांनी केले आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group