प्रा.डॉ.महेश निकत सर राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार 2024 जाहिर
करमाळा प्रतिनिधी
ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चे प्रा. डॉ. महेश निकत सर यांना माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मलकापूर ,जिल्हा-बुलढाणा तर्फे आयोजित “राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार 2024” मधील ‘आदर्श शिक्षकरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार तालुका शिक्षक संघ पद संस्था हॉल मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे अतिथी व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक सुभाष राजापुरे यांनी पत्राद्वारे कळवली आहे. करमाळा तालुक्यातील शैक्षणिक कार्यातील तसेच सामाजिक कार्यातील दखल घेत माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला याचे वितरण दिनांक 8 जून 2024 रोजी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे होणार आहे.