आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये मुळव्याध संबंधी शिबिर संपन्न
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सदर शिबिराचे आयोजन मुळव्याध आजारासंबंधी महाराष्ट्र राज्यामध्ये नामांकित असलेले डॉ श्री प्रदीप तुपेरे साहेब, डॉ श्री विलास सकत साहेब व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिरामध्ये 130 नागरिकांनी सहभाग नोंदवला मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी विविध तपासण्या करून काही ऑपरेटिव्ह असणाऱ्या नागरिकांचे ऑपरेशन करण्यात आले या सर्व सुविधा नामात्रदरामध्ये या शिबिरामध्ये देण्यात आल्या जाधव -पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा असणारे डॉ रोहन पाटील यांच्या आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये 130 रुग्णांनी तपासणी करून घेतली सदर सेवा सुविधा संस्थेच्या माध्यमातून सवलती च्या दरात रूग्णांना देण्यात आल्या त्यासाठी जाधव -पाटील हॉस्पिटल मधील त्यांचे डॉक्टर्स व संबंधित कर्मचारी यांनी सहकार्य करून नागरिकांना उत्तम अशी सेवा देण्यात आली जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये इथून पुढेही करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रोगासंबंधीच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे नमूद केले शिबीरास संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते
त्याचबरोबर भविष्य काळामध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषय, वृक्षारोपण , नर्सिंग प्रशिक्षण, रक्तदान,अनाथांसाठी सेवा व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले.
