करमाळा

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी भूलतज्ञ नेमणुकीबाबतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुक्याच्या मागणीला यश*

करमाळा प्रतिनिधी.
करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी भूलतज्ञाच्या नेमणुकीबाबतच्या करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश आले असल्याचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले.
याबाबत पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात भूल तज्ञ कायमस्वरूपी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना सोलापूर नगर येथे पाठवावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार संजयमामा शिंदे यांना भूलतज्ञ नेमणुकीबाबत मागणी करण्यात आली होती या मागणीला यश आले असून डॉक्टर अंकुश पवार यांची कायमस्वरूपी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भुलतज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे .याबद्दल करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत भाऊ अवताडे ,जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार ता.कार्याध्यक्ष सुजित बागल,ता.प्रवक्ते अजित विघ्ने,युवक ता.अध्यक्ष किरण फुंदे,देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड,माजी नगरसेवक महादेव फंड,स्वप्निल पाडुळे यांनी मागणी केली होती या मागणीस यश आले असून करमाळा तालुक्यातील रुग्णांना आता तात्काळ तत्परतेने सुविधा मिळणार असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कर्तव्यदक्ष कार्यक्षम आमदार आमदार संजयमामा शिंदे यांचे करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group