उमरडचे प्रा.नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी उमरड ता. करमाळा येथील श्री. नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व निवेदन क्षेत्रातील कार्याबद्दल शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण साडे निलंगे मळा येथे शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या आठव्या पुण्यस्मरणाबद्दल करण्यात आले यावेळी आमदार नारायण आबा पाटील कर्नल यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र असे होते. भारतीय सेनेतील शहिद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्याची दखल घेत. शहिद मेजर अमोल निलंगे स्मारक समिती समाजभूषण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण शहिद मेजर अमोल निलंगे स्मारक समिती, साडे व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
