श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे शिवजयंतीच्या निमित्ताने शुभारंभ अल्प दरात होणार उपचार
करमाळा (प्रतिनिधी )
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या नावाने करमाळ्यात उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन बुधवार 19 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता होत असून
यामध्ये हॉस्पिटलमध्ये अल्प दरात रुग्णांना रुग्णसेवा देणार असल्याची माहिती डॉक्टर ओंकार उघडे यांनी दिली आहेमु ख्यमंत्री कार्यालयाचे osd मंगेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हॉस्पिटलचे सचिव दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.शंभर रुपयांमध्ये रुग्णांची तपासणी करून व इंजेक्शन दिले जाणार असून पुढील सात दिवस मोफत रेगुलर तपासणी केली जाणार आहे.सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यासाठी मुंबई ठाणे पुणे येथून नामांकित डॉक्टर दर आठवड्याला करमाळ्याला आहेत.अत्यंत माफक दरात उपचार व ऑपरेशन करण्याची सोय या माध्यमातून करमाळा वासियांना होणार आहेया ठिकाणीच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटर सुरू असून कैलासवासी मनोहर पंत चिवटे संचलितश्री कमला भवानी ब्लड बँक सुरू आहे.डॉक्टर ओंकार उघडे हे एमबीबीएस पदवी प्रदान केलेले डॉक्टर असूनदीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रुबी हॉलकेईएम हॉस्पिटल सायन हॉस्पिटल अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहेहृ.दयविकार कॅन्सर दमा त्वचारोग लिव्हर किडनी गुडगा मणका ऑपरेशन सर्पदंश उपचार आदीची सोय करून दिली जाणार आहे.महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त मोफत सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेअशी माहिती सचिव दीपक पाटणे यांनी दिली आहे
######
सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना अत्यंत अल्प दरात चांगली दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून करमाळा तालुक्यातील कोणताही रुग्ण उपचाराविना किंवा मार्गदर्शना विना परत जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊन
रुग्ण सेवा सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन काम करू
असे डॉक्टर ओंकार उघडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
