राष्ट्रवादीच्या माध्यमातून जनतेच्या विकासकामांना प्राधान्य देणार – नूतन प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मा आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून जनतेच्या विकासकामांना प्राधान्य देणार अशी माहिती नूतन प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नूतन प्रदेश सरचिटणीसपदी अजिंक्य पाटील यांना नियुक्तीचे पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिले आहे.
त्यावेळी नुतन सरचिटणीस पाटील बोलत होते पुढे बोलताना म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात युवकांची फळी उभा करून राष्ट्रवादी काँग्रेस ताळागाळा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी राहुल जाधव पाटील, राहुल वनारसे , खंडु जाधव, जन्मजेय राजेभोसले, आदिजण उपस्थित होते
प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल करमाळा तालुका व शहरातील अनेक मान्यवरांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
