Wednesday, June 10, 2026
Latest:
Uncategorized

प्रा .डॉ महेश निकत सर यांना शिक्षण क्षेत्राबद्दल दादासाहेब फाळके इंटरनॅशनल पुरस्कार 2025 ने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी 14 मे रोजी प्रा डॉ महेश निकत सर यांनी करमाळा तालुक्यांत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 देऊन सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार भूमाता ब्रिगेड च्या संस्थापिका तृप्ती देसाई, देवमाणूस फेम मंगली आत्या (पुष्पा चौधरी), संस्थेचे अध्यक्ष डॉ अविनाश सकुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.या पुरस्काराची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ अविनाश सकुंडे यांनी पत्राद्वारे दिली होती.तुमची कला आणि कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे, आपल्या कार्यामुळे समाजातील अनेकांना नवी दिशा व प्रेरणा देईल त्यासाठी हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होईल असे संस्थेचे अध्यक्ष यांनी पत्रात म्हटले आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय हे ११० – रोहम्पटन वाले लंडन, युनायटेड किंगडम येथे असून पुण्यातील विजयनगर दिघी येथील कार्यालयातून ही निवड पत्र प्रकाशित केले गेले आहे.हा पुरस्कार पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी पार पडला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!