२२ तारखेला महापूरामुळे संगोबा मंदिरात अडकलेल्या नागरिकांना व आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित ठिकाणी आणुन पाळला माणुसकीचा धर्म – ॲड. राहुल सावंत

करमाळा प्रतिनिधी. २२ सप्टेंबर रोजी महापूरामुळे सिना नदी काठी संगोबा मंदिरात जवळपास शंभर नागरिक सुमारे २८ तास अडकली होती. त्यांना व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचारी यांना ट्रॅक्टर मधून सुरक्षित ठिकाणी आणले अशी माहिती आदिनाथ कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत यांनी दिली.
संगोबा मंदिरात अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी प्रशासना कडून आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचारी गेली होती. परंतु आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचारी हे सुरूवातीला चार नागरिक बोट मध्ये घेऊन निघाले पण येताना त्यांची बोट साधारण तीन तास महापूरात अडकली होती.
त्यानंतर एक ट्रॅक्टर मदतीला धावून गेला होता परंतु तो ट्रॅक्टर सुध्दा महा पूरात अडकला.
त्यानंतर ॲड. राहुल सावंत, सरपंच अंकुश शिंदे, भाऊ गरड, संदिप टकले, विशाल हाके, गणेश मोरे, लेमन गायकवाड, तुषार शिंदे,शांतीलाल झिंजाडे आम्ही दुसरा ट्रॅक्टर घेऊन महापूरातून पोथरे ढेकळवाडी निलज या मार्गे संगोबा मंदिरात पोहोचलो. ट्रॅक्टर मधून जाताना आणि येताना खूप खूप अवघड काम होते तर आम्ही सगळे जण धाडसाने व जिकिरीने गेलो. आम्ही सुरूवातीला आपत्ती व्यवस्थापन च्या माणसांना व बोटीत अडकलेले चार माणसे यांना संगोबा मंदिरात सुरक्षित ठिकाणी आणले. त्यानंतर तेथे २८ तास अडकलेले साधारण शंभर पैकी 80 नागरिक सुरक्षित ठिकाणी महामुनी कार्यलयात आणले. राहिलेले नागरिक त्यांच्या इच्छेनुसार मंदिरात सुरक्षित ठिकाणी आहेत.
यासाठी ॲड. राहुल सावंत, सरपंच अंकुश शिंदे, सुनिल जाधव, सचिन भोई, दादा भोई, गणेश मोरे, नारायण मस्के, राजेंद्र भालेराव, बळी राऊत, संदिप टकले, विशाल हाके, भाऊ गरड, पप्पू नंदरगे, धनाजी नरूटे, ग्रामसेवक श्री. मोकाशी, सागर सामसे, पप्पू रंदवे यांनी मदतीसाठी सहकार्य केले


