Sunday, August 2, 2026
करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी ५०,०००/-रू किंमतीचे एक पिस्टल व दोन जिवंत राउंड केले जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ५०,०००/-रू किंमतीचे एक पिस्टल व दोन जिवंत राउंड केले जप्त केले आहे .शुक्रवार २६/०९/२०२५ रोजी मा. रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांनी व त्यांचे पथकांनी केलेली कारवाई केली आहे.
यात हकिकत अशी कि, दि २६/०९/२०२५ रोजी नवरात्रोत्सावाचे अनुषंगाने करमाळा शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोकों/८५६ अर्जुन गोसावी यांना गोपनिय बातमी मिळाली कि, मौलाली माळ, करमाळा येथे एक इसम कमरेस पिस्टल लावुन संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने सदर बाबत पोकों / अर्जुन गोसावी यांनी आम्हांस माहिती दिली. सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना बोलावून घेवून सदर बातमीच्या अनुषंगाने माहीती व सुचना देवून योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश देवून स्वाना होणेबाबत आदेशीत केले,त्यावेळी सदर पथकातील पोना मनिष पवार यांनी दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन घेवून त्यांना सोबत घेवून सदरचे पथक हे मौलाली माळ, करमाळा येथे जावून तेथे बराच वेळ त्याचा शोध घेतलेनंतर अंधारात एका लाईटच्या खांबाच्या उजेडात एक इसम मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयीत रित्या फिरत असताना दिसुन आला. त्यावेळी तो सदर पथकास पाहताच कावराबावरा होवून तो पळून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सदर पथकातील पोलीसांनी त्यास जागीच पकडले ती वेळ १९/५० वा.ची होती. त्यावेळी सोबत असलेल्या पंचासमक्ष त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आमिन रशिद बेग, वय ३३ वर्षे रा. मौलाली माळ, करमाळा ता. करमाळा जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे खालील वर्णनाचे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन पितळी धातूचे जिवंत राउंड असा एकूण ५०,०००/-रु किंमतीचा मुददेमाल मिळून आला नमुद मिळून आलेल्या पिस्टल व रांउडबाबत आरोपीस सदर पिस्टल व जीवंत रांउड याबाबतचा आपल्याकडे जवळ बाळगळयाचा परवाना आहे अगर कसे असे विचारले असता त्याने तसा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तो पोना पवार यांनी गुन्हयाचे तपासकामी जप्त केला आहे.
सदर आरोपीस व मुददेमालास पोलीस ठाणेस आणुन सदर इसमाविरूध्द पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाणे गुरनं. ७८७/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीचा अभिलेख पाहीला असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द दरोडयाचा प्रयत्न, एन डी पी एस अॅक्ट अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास हा पोलीस हवालदार अजित उबाळे हे करीत आहेत.सदर आरोपी नामे अमिन रशिद बेग, वय ३३ वर्षे, रा. मौलाली माळ, करमाळा, ता. करमाळा जि सोलापुर याचे विरूध्द असलेले दाखल गुन्हे खालील प्रमाणे…

अ.क. गुन्हा रजि. नंबर०१करमाळा पो. ठाणे गुरनं. ११७/२०१४,०२,करमाळा पो. ठाणे गुरनं. ११८/२०१४
०३ करमाळा पो. ठाणे गुरनं, २६९/२०२४कलम
भा.द. वि. कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ भा.द.वि. कलम ३९९,४०२,एन.डी.पी.एस. अॅक्ट ८ (क), २० (ब) (ii), (ब)सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही. एस., करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ मिलींद दहीहांडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ/ योगेश येवले पोकों समाधान भराटे, पोकॉ अमोल रंदिल, पोकॉ गणेश खोटे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!