करमाळा

युवा नेते शंभूराजे जगताप यांचे प्रसंगावधानामुळे वाचले प्राण जखमीना तात्काळ ऍम्ब्युलन्स ची वाट न पाहता आपल्या गाडीत सर्वांना उचलून नेऊन करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी केले दाखल

करमाळा प्रतिनिधी 
नेहमीच्या विविध दौऱ्यानिमित्त शंभूराजे जगताप हे करमाळा येथून शेटफळ (ना ) येथे कार्यमासाठी निघाले होते,झरे -खडकेवाडी फाटा येथे लोकांची गर्दी दिसली असता शंभूराजेंनी आपली गाडी थांबण्यास सांगितली व खाली उतरून पाहिले असता रस्त्यावर गंभीर अपघात झाला होता, त्यात सहा वर्षाचा छोटा मुलगा, बारा – चौदा वर्षाच्या दोन मुली पस्तीस वर्षाची महिला व साधारण चाळीश वर्षाचा पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसलें. हा अपघात टाटा इंडिगो व दुचाकी यात घडला असून. दुचाकी अचानक मध्ये आल्यामुळे चारचाकी चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु वेग असल्यामुळे अनर्थ घडला.
बघ्यांची फक्त गर्दी होती कोणीही मदतीला पुढे येतं नव्हते अशात शंभूराजे जगताप तेथे आले व जखमीना तात्काळ ऍम्ब्युलन्स ची वाट न पाहता आपल्या गाडीत सर्वांना उचलून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शंभूराजे चे सहयोगी गुरुदत्त चव्हाण यांनी रुग्णालय पोहोच केले.
दुचाकी वाचवण्यासाठी चारचाकी गाडी डिवाडर ला अदळून रस्त्याच्या पलीकडे गेली होती. गाडीतील काही महिला व पुरुष खूप घाबरले होते त्यांना हि शंभूराजे जगताप यांनी धीर दिला.जमलेल्या लोकांनी अपघाबद्दल हळहळ व्यक्त केली व शंभूराजे जागताप यांचे प्रसंगावधान पाहून खूप कौतुक हि केले.
दुचाकी वरील छोटी मुले व त्यांचे नातेवाईक लवकरात लवकर रुग्णालयात पोहोच केल्यामुळे त्यांचे हि प्राण वाचले.
या घटने मुळे सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला होता पण देवदूत आल्याप्रमाणे शंभूराजे जगताप आले व त्यांच्या प्रसंगावधानामुळे सर्वांना हायसे वाटले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!