करमाळा

करमाळा नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधून गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 19 जणांनी घेतली माघार ‌

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीमधून गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 19 जणांनी माघार ‌ घेतली आहे अशी माहिती सहाय्यक ‌निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिन तपसे यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा नगरपरिषदेच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सौ संगीता श्रेणीक खाटेर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या नगरसेवकाच्या उमेदवारीमधुन ओंकार नारायण ढाळे श्रीमती ललिता करण आलाट श्रीमती ज्योती सचिन घोलप,श्री. जयप्रकाश कोडीबा बिले,श्री. सुनिल भिमराव धाकतोडे श्री. विजयकुमार बाळासाहेब घोलप,श्रीमती विद्या सुरज मांगले
श्री. महेश दत्तात्रय पाटोळे श्री. दादासाहेब महादेव ढाणे,श्रीमती सुजाता ज्योतीराम ढाणे श्री. शानूर अहमद कुरेशी,श्री. गौरव श्रीनिवास कांबळे श्री. दिनेश हनुमंत जाधव श्री. बसवराज सोमनाथ चिवटे श्रीमती सीमा रामदास कुंभार श्रीमती नौशाद हुसेन बागवान श्रीमती संगिता श्रेणिक खाटेर नगराध्यक्ष श्रीमती मोक्षा संकेत खाटेर श्री. अमोल हरिभाऊ फंड यांनी माघार घेतली आहे.नगरपालिकेचे निवडणूक जशी जवळ येत आहे तशी उमेदवारांची माघार घेण्याची संख्या वाढत असून आपल्या उमेदवारांना अडचण नको म्हणून बऱ्याच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नेते मंडळींच्या शब्दावर व पुढील राजकीय वाटचालीसाठी या निवडणुकी मधून माघार घेतली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!