करमाळा तालुक्याचे विकासप्रिय माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या विकास निधीतून तालुक्यातील जनतेला तत्पर आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिसरे येथे आरोग्य केंद्र उभारणीस प्रारंभ – भरत भाऊ आवताडे
*
करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील नागरिकांना योग्य व तत्पर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून फिसरे येथे आरोग्य केंद्र उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती नूतन पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत (भाऊ) आवताडे यांनी दिली आहे.
फिसरे येथे उभारण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा गावाजवळच मिळाव्यात आणि छोट्या-मोठ्या आजारांसाठी दूरवर जावे लागू नये, या उद्देशाने या आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे फिसरेसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
यावेळी बोलताना भरत (भाऊ) आवताडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य सुविधा उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामे राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून फिसरे येथे आरोग्य केंद्र उभारले जात आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास प्रदीप दौंडे (माजी सरपंच), संदीप नेटके (माजी उपसरपंच), धनंजय नेटके, शरद नेटके, रत्नाकर अडसूळ, सुनील नेटके, सुनील काटे, विनोद नेटके, सौरभ रोकडे, राहुल पवार, वामन अडसूळ, नवनाथ पवार, सोमनाथ पाटील, देविदास पाटील, ज्ञानेश्वर चाळक, भारत ढावरे, गजानन चाळक, अक्षय नेटके, केरबा ढावरे, सुरेश पवार, अमोल चव्हाण, हनुमंत पवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य केंद्राच्या उभारणीमुळे फिसरे व परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार, तपासणी व इतर आरोग्य सेवा गावाजवळच उपलब्ध होणार असून नागरिकांची मोठी सोय होणार असल्याची भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


