जागतिक महिला दिनानिमित्त करमाळा नगर परिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त करमाळा नगरपरिषद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून करमाळा शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता विकी मंगल कार्यालय, करमाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळ्याच्या तहसिलदार सौ. शिल्पाताई ठोकडे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच डि.वाय.एस.पी. अंजना कृष्णा व्ही. एस. या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई सावंत राहणार असून महिला व बालकल्याण सभापती श्रीमती निर्मलाताई गायकवाड, मुख्याधिकारी सचिन तपसे, नगरसेविका जबीन खलील मुलाणी, नगरसेविका ज्योत्सना सुनिलकुमार लुणिया, नगरसेविका सुवर्णा रोहिदास आलाट, नगरसेवक विक्रमसिंग विजयसिंग परदेशी, नगरसेवक दिपक अरुण चव्हाण, नगरसेविका लता विजयकुमार घोलप, नगरसेवक श्रीसिद्धेश सुधाकर लावंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा प्रबोधन प्रमुख भिष्माचार्य चांदणे, जिल्हा सदस्य शशीकांत नरुटे (ग्राहक संरक्षण कक्ष, सोलापूर), तालुकाध्यक्ष ब्रम्हदेव नलवडे, तालुका कोषाध्यक्ष निलिमाताई पुंडे, सुलभा पाटील तसेच जिल्हा प्रमुख महिला आघाडी माधुरी परदेशी, तालुका सचिव अजिम खान, सारीका पुराणीक, मंजिरी जोशी आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक कु. गिरीजाताई म्हस्के, करमाळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अतुल फंड तसेच नगरसेवक व नगरसेविका यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये नगरसेवक रवि नारायण जाधव, नगरसेविका पुजा तुकाराम इंदलकर, नगरसेवक प्रशांत मोहन ढाळे, नगरसेवक युवराज विलास चिवटे, नगरसेविका सुनिता बाळू ढाणे, नगरसेविका चैताली सुनिल सावंत यांचा समावेश आहे.
तसेच स्त्रीरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी सौ. स्मिता बंडगर (उपजिल्हा रुग्णालय, करमाळा), सहशिक्षिका ज्योतीताई शहाणे-बोकन (श्री कमलादेवी कन्या विद्यालय, करमाळा), सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव, नगरसेवक संजय भगवान सावंत, नगरसेविका स्वाती महादेव फंड, नगरसेविका साजेदा अहमद कुरेशी, नगरसेविका अश्विनी सचिन अब्दुले, नगरसेवक सचिन रामचंद्र घोलप, नगरसेवक संदिप नामदेव कांबळे, नगरसेवक सुनिल अर्जुन बनसुडे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा कोषाध्यक्ष ललिता वांगडे, सहसचिव चक्रधर पाटील, निशीगंधा शेंडे, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती माने तसेच करमाळा नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, करमाळा येथील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच उत्कृष्ट सहभागींना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे करमाळा शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


