Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

श्रीराम प्रतिष्ठान मार्फत रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना मोफत दूध वाटप

 

करमाळा प्रतिनिधी  सालाबाद प्रमाणे श्रीराम प्रतिष्ठान कडून गेली 13 वर्षांची परंपरा अखंडपणे जपत या वर्षीही मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद या पवित्र सणानिमित्त गोरगरीब मुस्लिम बांधवांना 1300 लिटर दुधाचे मोफत वाटप करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.स.सा. कारखान्याचे व्हाईस चेअरमन रमेश आण्णा कांबळे ,मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम दादा राखुंडे, कमलादेवी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथशेठ चिवटे, अर्बन बँकेचे माजी चेअरमन अनिलभाऊ वाशिंबेकर ,रेहणुमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कलीम काझी सर, सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण ,किरण किरवे सर, चंद्रकांत चुंबळकर, जाकीर बागवान ,तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, भाजपा युवा मोर्चा प्रदेश चिटणीस दीपक चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल ,सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी ,तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, पत्रकार नासीर कबीर ,जयंत दळवी ,संजय शिंदे, जयंत कोष्टी, अशपाक सय्यद उपस्थित होते
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या कामाचा गौरव करताना दरवर्षी रमजानईद निमित्त मुस्लिम बांधवांना मोफत दुध वाटप करून सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य श्रीराम प्रतिष्ठाण करत आहे.गणेश चिवटे हे हिंदू मुस्लिम ऐक्यातील दुवा आहेत असे प्रतिपादन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले कि देशात संविधान हा एकच ग्रंथ आसून त्यातून हिंदू मुस्लिम सिख ईसाइ सभी भाई भाई हाच संदेश दिला जातो.असेही ते म्हणाले .
तसेच रमेश आण्णा कांबळे यांनी करमाळा तालुक्यात सर्वधर्मीय एकोप्याने नांदत आहेत त्यातच श्रीराम प्रतिष्ठानने केलेले काम हे सामाजिक एकोप्याचा संदेश देत आहे असे म्हटले, पुढे पत्रकार नासीर कबीर यांनी आपल्या मनोगतात गणेश भाऊ चिवटे यांचे कार्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारे ठरेल कारण सध्या महाराष्ट्रात भोंगा , हनुमान चालीसा हा वाद असताना श्रीराम प्रतिष्ठानने एक नवीन दिशा देण्याचे काम केले आहे असे सांगितले,
समारोपप्रसंगी बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा मांडला ,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य अफसर जाधव ,रामभाऊ ढाणे ,मोहन शिंदे ,काकासाहेब सरडे ,संग्रामसिंह परदेशी, गजराज चिवटे ,शंभुनाथ मेरुकर, सचिन भणगे, ऋषिकेश फंड ,भैया कुंभार, युवराज किरवे ,प्रकाश ननवरे ,हर्षद गाडे ,संदीप काळे, आजिनाथ सुरवसे ,किरण वाळुंजकर ,अशोक मोरे, धर्मराज नाळे ,वैभव आहेर, सुरज शेख ,मस्तान कुरेशी, जयंत काळे पाटील, सचिन ढाणे ,कमलेश दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group