आध्यात्मिककरमाळा

अक्षयतृतीया निमित्ताने श्री कमलाभवानी मंदिरात फळांची आरास!

करमाळा प्रतिनिधी! करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील प्रसिद्ध श्री कमलाभवानी मंदिरात अक्षय तृतीया निमित्ताने केळी व चिक्कू या फळांची आरास करण्यात आली या साठी लातूर महानगरपालिका उपायुक्त विणा ज्योर्तिलिंग पाटकर पवार यांनी योगदान दिले. भोसे येथील माजी सैनिक अधिकारी व प्रगतशील बागायतदार अरुण ईश्वर पाटील व वंदना अरुण पाटील यांनी चिक्कु उपलब्ध करून दिलै तर मांजरगाव येथील चंद्रकांत कुंभार यांनी केळी उपलब्ध करून दिली. ही फळांची आकर्षक आरास निलेश भुसारे, व करमाळा नगरपालिकेचे विकास पवार यांनी केली. करमाळा नगरपालिकेत २०१८-२०२१ या काळात मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या विणा पवार यांची नुकतीच पदोन्नति होऊन त्या लातूर महानगरपालिका उपायुक्त पदावर नियुक्त झालेल्या आहेत करमाळा नगरपालिकेत मुख्याधिकारी पदावर काम करत असताना त्यांनी धाडसी निर्णय घेवून विशेषतः कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केले त्यांचे कामाचे फार कौतुक झाले त्यांना नागरिकांनी व कर्मचा-यानी पुर्ण सहकार्य केले. मला आतापर्यंत जे यश प्राप्त झाले आहे त्यामागे श्री कमलाभवानी मातेची कृपादृष्टी असल्याची प्रचीती मला आली आहे यामुळे मी आज भवानी मातेचा आर्शिवाद घेण्यासाठी आले असताना सर्वांनी माझा सन्मान केला या बद्दल मी आभारी आहे असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी श्री कमलाभवानी मातेची भोगी पुजा त्यांचे हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी दादासाहेब पुजारी, नारायण सोरटे, कमलाकर सोरटे, रविराज पुराणिक, भाऊसाहेब फुलारी, महादेव भोसले, अशोक घाटे, शिवाजी पकाले, राहूल सोरटे, पद्माकर सुर्यपुजारी, रमेश येळवणे, ईश्वर पवार इत्यादी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!