Saturday, April 18, 2026
Latest:
Uncategorized

करमाळ्यातील एकलव्य आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था

करमाळा / प्रतिनिधी
करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर बेडचा उदघाट्न कार्यक्रम पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने हे होते. याप्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे प्रमुख प्रा. गणेश करे-पाटील, सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई माने, जेष्ठ पत्रकार आशपाक सय्यद, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना तालुकाध्यक्ष दिनेश मडके, ऍड. संग्राम माने, श्रेयस खडके, कृष्णा भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते फित कापून उदघाट्न करण्यात आले. यावेळी प्रा. करे- पाटील यांनी यशकल्याणी संस्थेच्या वतीने आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देवून गौरविले.आश्रमशाळेच्या उपाध्यक्षा स्वातीताई माने यांनी आश्रमशाळेच्या वाटचालीची माहिती दिली. सूत्रसंचलन शिक्षक किशोरकुमार शिंदे यांनी केले. तर ऍड. संग्राम माने यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, शिक्षक कुमार पाटील, विलास कलाल, प्रल्हाद राऊत, शिक्षिका विद्या पाटील तसेच सैदास काळे, वदंना भालशंकर, दिपाली माने आदि कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
———— आश्रमशाळेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी समाजातील उपेक्षित, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगती पोहचवायची असेल, तर शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहत मिळालेल्या शैक्षणिक संधीचे सोने करावे.
– प्रा. गणेश करे – पाटील, यशकल्याणी प्रमुख
———–    उपेक्षित, वंचित घटकातील मुले आश्रमशाळेत शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शाळेच्या प्रवाहात आलेल्या मुलांनी शिक्षण घेवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यावर भर दिला पाहिजे.
– रामकृष्ण माने, संस्थापक एकलव्य आश्रमशाळा
–मुलांनी मोठी स्वप्ने पाहावीत, स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे वाटचाल केल्यास मदतीचे हात मिळत राहतात.
– आशपाक सय्यद, जेष्ठ पत्रकार,
—-आश्रमशाळेची वाटचाल प्रभावी आहे. समाजातील दानशूर प्रतिनिधीनी शाळेसाठी मदत केळी पाहिजे. शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्यावर भर दिला पाहिजे.
– दिनेश मडके, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना तालुकाध्यक्ष करमाळा

error: Don\'t try to copy. Content is protected !!