करमाळा

इंटरनेट सेवा देण्याच्या नावाखाली केबल साठीचे नियमबाह्य खोदकाम जीवावर बेतले: अ‍ॅड बालाजी इंगळे गंभीर जखमी ! ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सतीश निळ यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर रस्ता खोदण्याचे काम सुरू असून, या बेफिकीर ठेकेदारामुळे निमगाव हवेली येथील ॲड. श्री बालाजी इंगळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. डांबरी रस्त्यावर मुरूम टाकल्याने त्यांची मोटारसायकल स्लिप होऊन हा अपघात झाला असून, ते अजूनही शुद्धीवर आलेले नाहीत. हायवे रस्त्यावर असलेल्या मुरूमा मुळेच हा अपघात झाला असल्याचा आरोप मकाई साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ यांनी केला आहे.

सदरचा अपघात ५ एप्रिल रोजी करमाळा सालसे रोडवरील वायकुळे पाटील वस्ती जवळ घडला आहे. मुरूमावरून मोटार सायकल स्लिप होऊन खोदलेल्या चारीत गेली काही प्रत्यक्षदर्शींनी सतीश निळ यांना सांतगीले आहे.अपघाता पासून इंगळे बेशुद्ध अवस्थेत असून बार्शी येथील भगवंत हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर सतिश निळ यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार करमाळा व पोलीस निरीक्षक करमाळा यांना लेखी निवेदन दिले आहे. “संबंधित ठेकेदाराविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा दाखल न झाल्यास पूर्व भागातील ग्रामस्थांसोबत तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसू,” असा इशारा निळ यांनी दिला आहे.ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी देखील अनेक वेळा या नियमबाह्य कामांबाबत आवाज उठवला होता. संबंधित विभागाकडे तक्रारीही केल्या होत्या. मात्र वारंवार या ठेकेदारांना पाठिशी घातले जात आहे, आज हे नियमबाह्य काम व प्रशासनाची खाबुगिरी एका वकिलाच्या जीवावर उठली आहे. “आत्ता तरी प्रशासन जागे होणार का? लोकांचे जीव यांच्या लेखी इतके स्वस्त आहेत का?” असा संतप्त सवाल फरतडे यांनी विचारला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!