शुद्धतेची परंपरा, विश्वासाचा नवा अध्याय! करमाळ्यात ‘आनंदी ज्वेल्स’चा दिमाखदार शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी – करमाळा शहरातील सराफा व्यवसायात विश्वास आणि शुद्धतेची परंपरा पुढे नेत ‘आनंदी ज्वेल्स’ या नव्या दागिन्यांच्या दालनाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शुभारंभ करण्यात आला. सकाळी १० वाजता पार पडलेल्या या सोहळ्यास व्यापारी, मान्यवर नागरिक तसेच ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“शुद्धता जपणारी कलाकुसर” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या दालनात सोनं, चांदी व डायमंड दागिन्यांचे आकर्षक आणि आधुनिक डिझाईन्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. पारंपरिकतेसह आधुनिकतेचा सुंदर संगम साधत विविध आवडीनिवडी लक्षात घेऊन दागिन्यांची विस्तृत श्रेणी सादर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमामागे अभिजीत अशोक दोशी व अमोल अशोक दोशी यांचे विशेष प्रयत्न असून, समस्त दोशी परिवाराच्या सहकार्याने हा व्यवसाय उभारण्यात आला आहे. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवीन दालनास शुभेच्छा देत व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
जैन मंदिर शेजारी, मेन रोड या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या या दालनामुळे करमाळा व परिसरातील ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह दागिन्यांची सोयीस्कर उपलब्धता होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
नवीन उपक्रमामुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळून आर्थिक व्यवहारांना गती येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला जात आहे.


