Monday, April 27, 2026
Latest:
करमाळा

संस्कार, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर दोशी परिवाराची भरारी आनंदी ज्वेल्स’चे दिमाखात उद्घघाटन


करमाळा प्रतिनिधी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर दोशी परिवाराने व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या प्रगतीमागे दृढ धार्मिक संस्कार, प्रामाणिक व्यवहार आणि संस्कृतीची जपणूक हे महत्त्वाचे घटक असून, या मूल्यांच्या जोरावर त्यांनी यशाची उंची गाठली आहे. आगामी काळातही ते अधिक मोठे यश संपादन करतील, असा विश्वास बारामती येथील चंदुकाका ज्वेलर्सचे संचालक अतुल शहा यांनी व्यक्त केला.
करमाळा शहरातील जैन मंदिर परिसराशेजारी ‘मेनरोवर आनंदी ज्वेल्स’ या नव्या सोने-चांदी विक्रीच्या भव्य दुकानाचे उद्घघाटन अतुल शहा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्यास संत साहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबुराव हिरडे तसेच साडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एन. डी. सुरवसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घघाटन प्रसंगी परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्राहक आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अतुल शहा पुढे म्हणाले की, दोशी परिवाराने परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर समन्वय साधत व्यवसाय उभारला आहे. त्यांनी नेहमीच प्रामाणिकतेला प्राधान्य दिले आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला. अशोककुमार दोशी, राजकुमार दोशी आणि सौ. अर्चना दोशी यांनी व्यवसायाची भक्कम पायाभरणी केली, तर युवा पिढीतील अमोल दोशी, अभिजित दोशी, यशराज दोशी व प्रतीक दोशी यांनी आधुनिक दृष्टिकोन आणि नवकल्पनांच्या साहाय्याने व्यवसायाला नवीन उंचीवर नेले आहे.
कार्यक्रमात एन. डी. सुरवसे यांनी शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करत दोशी परिवाराच्या कार्याचे कौतुक केले, तर अॅड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी संत साहित्याच्या संदर्भातून प्रामाणिकतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व स्पष्ट केले.
उपस्थितांचे स्वागत अमोल दोशी व अभिजित दोशी यांनी केले.
या वेळी सुनंदा गांधी, मृदुला गांधी, सुषमा चंकेश्वरा, विदुलता चंकेश्वरा, प्रवीण गांधी, बबनभाऊ सुरवसे, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी तसेच नवभारत इंग्लिश स्कूलच्या सुनिता देवी आदी मान्यवर व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!