Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

घारगाव हद्दीतील गावाच्या पश्चिम बाजूस असलेल्या शासकीय पाझर तलावामध्ये अनधिकृतपणे खोदलेल्या विहिरीवर कायदेशीर कारवाई व्हावी

घारगाव प्रतिनिधी
मौजे घारगाव हद्दीच्या पश्चिम बाजूस पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून निर्माण केलेल्या शासकीय पाझर तलावामध्ये बेकायदेशीर व अनधिकृतपणे गावातील अनेक लोकांनी विहिरी व बोरवेल खोदलेले आहेत आणि पाझर तलावातून पाईपलाईन केलेले आहेत घारगाव मध्ये हा पाझर तलाव शासनाच्या ताब्यात असून या पाझर तलावाचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पिण्यासाठी जनावरांसाठी व पशुपक्ष्यांसाठी उपयोग केला जात आहे तसेच संपूर्ण गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठ्याची इंधन विहीरही या तलावाच्या नजीक आहे त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या तलावातील पाणी या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीसाठी उपयोगात येत आहे
मात्र या पाझर तलावामध्ये व गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा इंधन विहिरीच्या जवळच अनेक लोकांनी बेकायदेशीर अनधिकृतपणे विहिरी खोदलेल्या आहेत यामुळे शासकीय पाझर तलाव हा शासकीय राहिलेला नसून गावातील अनेक लोकांनी बेकायदेशीर अनाधिकृत विहिरी खोदून त्याचा वापर स्वतःसाठी केलेला आहे यामुळे गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे पाझर तलावातील अनाधिकृत बेकायदेशीर खोदलेल्या विहिरीमध्ये तलावातील पाणी जसजसे कमी होत जाईल तसतसे गावातील जनावरे लहान मुले कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला भगिनी यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याकारणाने वरीलपैकी पाळीव जनावरे व फिरस्ती जनावरे, लहान मुले, महिला भगिनी यांना धोका होऊन जलसमाधी मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही परिणामी त्यांच्या जीवितस मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो पाटबंधारे विभाग करमाळा यांना घारगावचे संजय सरवदे, संतोष होगले, राजेंद्र भोसले यांनी तक्रारी द्वारे गांभीर्यपूर्वक कळविण्यात आले आहे वेळीच या बेकायदेशीर अनाधिकृत विहिरींचा शासकीय पंचनामा करून त्या बुजवून घ्याव्यात व अनाधिकृत विहिरी खोदणाऱ्या व्यक्तींच्या स्थावर७/१२ सातबारावर मिळकतीवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार कायदेशीर बोजा व दंड लावण्यात यावा. आणि तो पाझर तलाव पूर्ववत करण्यात यावा.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group