Monday, September 21, 2026
Latest:
करमाळा

वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशालीताई विजय पाटील यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. वैशालीताई विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, पदाधिकारी तसेच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही निवड सरपंच तानाजी बापू झोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि गावाच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या प्रामाणिकपणे कार्य करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!