Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचे आयोजन

 

 

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये संपन्न होत असून, फार्मसी व लाईफ सायन्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि सुवर्णसंधी ठरणार आहे.दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय प्रा. रामदास झोळ सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्याच्या या ध्येयातूनच या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व दत्तकला शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक ०३ जून २०२६ रोजी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली, भिगवण, ता. दौंड, जि. पुणे येथे “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात नामांकित कंपन्या जसे की – सोहन हेल्थकेअर, क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी, मोडेप्रो इंडिया प्रा. लि., ओमनी ॲक्टीव्ह इंडिया प्रा. लि., एम जे बायोफार्मा लि., सेंच्युरी फार्मास्युटिकल लि., एमक्युअर फार्मा प्रा. लि., जिनेव्हा बायोफार्मा लि., इटेनरीस फाईन लि., हॉनर लॅब लि., अलिवुस लाईफसायन्स लि. आदी प्रतिष्ठित कंपन्या सहभागी होणार असून एकूण 198 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळावा, त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य संधी उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील युवक-युवतींना करिअरची नवी दिशा मिळावी, हा या रोजगार मेळाव्यामागील मुख्य उद्देश आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.ही संधी १० वी / १२ वी / डी.फार्म /बी.फार्म/ बीएससी केमेस्ट्री / एमएससी केमेस्ट्री / एमएससी बायोटेक्नॉलॉजी पात्रताधारक उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन संबंधित रिक्त पदांसाठी अर्ज करावे. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी (Walk-In Interview) उपस्थित राहताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व बायोडाटा च्या किमान 0५ प्रती सोबत आणाव्यात.अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, 481 रास्ता पेठ, पुणे -11 येथे 020 – 26133606 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. किंवा सेंट्रल प्लेसमेंट सेल , दत्तकाला शिक्षण संस्था यांच्या दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी,स्वामी -चिंचोली, भिगवण,पुणे,-४१३१३० येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. अथवा पुढील नंबरवर संपर्क साधावा डॉ. प्रतिभा मोरे – ८९८३४५३४३४,डॉ. आशिष जाधव – ९८२२६९३१५५, डॉ. जितेंद्र कंदाले – ९८८११५०९२२.

error: Don\'t try to copy. Content is protected !!