Friday, September 11, 2026
Latest:
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त करमाळ्यात पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत चहा-बिस्कीट वाटप* *कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम

करमाळा : प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठान यांच्या वतीने करमाळा शहरात मोफत चहा-बिस्कीट वाटपाचा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम नगरसेविका श्रीमती निर्मलाताई गायकवाड यांच्या माध्यमातून तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत दि. १७ जुलै ते १९ जुलै २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, करमाळा येथे करमाळा शहरातून जाणाऱ्या सर्व वारकरी व भाविकांना चहा व बिस्कीटाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि भक्ती संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने हा सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करण्यात आले असून, नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन वारकरी सेवेचे पुण्य प्राप्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम करमाळा शहरातील सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची परंपरा अधिक दृढ करणारा ठरत असून, भाविकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!