उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. मायाताई झोळ यांचा सामूहिक सत्कार संपन्न
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ.माया रामदास झोळ यांना उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सामूहिक सत्कार करण्यात आला. या सत्काराला करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष आबा गुळवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदूकाका सरडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविताराजे भोसले,
मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ बापू झोळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष काका सरडे, वाशिंबे चे माजी उपसरपंच अमोल पवार, डीगा तात्या रासकर, पप्पू उकिरडे, युसुफ शेख सर, गव्हाणे साहेब, रामदास झोळ, भीमराव झोळ, मनोज झोळ, बाळू शेख, अमोल भोईटे, सचिन भोईटे, सुभाष झोळ, अजित झोळ, योगेश झोळ, संकेत झोळ, आकाश झोळ, प्रफुल्ल झोळ, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळा रणदिवे, हमीद सय्यद इत्यादींनी सौ. मायाताई झोळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.रामदास झोळ सर व उपस्थित मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.*


