Sunday, September 13, 2026
Latest:
Uncategorized

प्रा. रामदास झोळ सर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धनादेश सुपूर्द

करमाळा, प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप नेते प्रा. रामदास मधुकर झोळ यांनी प्रा. रामदास झोळ फाउंडेशन, करमाळा तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता कक्षाला एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा धनादेश दि. २१ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीग्रस्त तसेच गरजू रुग्ण व आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत केली जाते. प्रा. झोळ यांनी दिलेल्या या आर्थिक मदतीमुळे गरजू व्यक्तींना आधार मिळणार आहे.
यापूर्वीही सन २०२५ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिंबे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला होता. त्याचवेळी मुख्यमंत्री सहायता कक्षालाही एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता.
प्रा. रामदास झोळ यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!