करमाळयात भारत विरुद्ध इराण कुस्ती
करमाळा प्रतिनिधी
हनुमान जयंती चे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदा ही 19 एप्रिल रोजी करमाळा शहरातील जीन मैदान येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये इराण. पंजाब येथील पैलवान येणार असल्याची माहिती आयोजक पैलवान सुनील बापु सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली
यावेळी बोलताना पै. सावंत म्हणाले की दरवर्षी प्रमाणे यंदा ही कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये इराण देशातील चॅम्पियन पैलवान अली इराणी. पंजाब चा पैलवान भुपेंद्रसिंग महाराष्ट्राचा तुफानी मल्ल सिंकदर शेख. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनील जाधव पै.सुरज निकम पै. विलास डाईफोडे. पै.योगेश पवार अश्या नामवंत मल्लांच्या कुस्त्या आयोजित केले असुन या मैदानात डोळ्याचे पारणे फेडेल अश्या कुस्त्या होणार असून सर्व कुस्ती शौकीनांनी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा तसेच यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे. माजी आमदार नारायण आबा पाटील. मकाई सह सा का चे अध्यक्ष दिग्विजय बागल. विद्या विकास मंडळाचेसचिव विलासराव घुमरे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी. तहसीलदार समीर माने. उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.विशाल हिरे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पुणे चे उद्योगपती रामभाऊ जगदाळे महाराष्ट्रातील नामवंत पैलवान विविध क्षेत्रातील सामाजिक राजकीय पदाधिकारी राज्यातील अनेक तालीमीतील वस्ताद आदी जण उपस्थित राहणार आहेत या कुस्ती मैदानात महाराष्ट केसरी पै चंद्रहास निमगीरे डबल उपमहाराष्ट्र केसरी पै अतुल पाटील कुस्ती सम्राट पै अस्लम काझी पै.भारत वस्ताद जाधव उपमहाराष्ट्र केसरी पै विजय मोडाळे पै प्रवीण घुले वस्ताद तसेच अनेक महाराष्ट्र चॅम्पियन नामवंत वस्ताद यांचा तालीम संघाचे वतीने सन्मान करण्यात येणार आहे यावेळी कुस्ती मैदानाचे समालोचन राजाभाऊ देवकते .धनाजी मदने करणार असुन आत॔रराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे अनुभव असणारे पैलवान पंच म्हणून काम करणार आहे सदरच्या सर्व कुस्त्या यु टयुब चॅनल थेट प्रेक्षपण पै गणेश मानगुडे करणार असल्याची माहिती आयोजक पैलवान सुनील बापु सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली
सदर कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पै.दादासाहेब इंदलकर. पै.श्रीकांत ढवळे. पै.नागेश सुर्यवंशी. नानासाहेबी मोरे सचिन गायकवाड विनोद महानवर पै.पिल्लू इंदलकर पै गणेश दादासाहेब सावंत जण परिश्रम घेत आहे.
