उजनी धरणातील मत्स्यसंवर्धनासाठी आ. संजयमामा शिंदे यांचेकडून प्रयत्न
करमाळा प्रतिनिधी
कंदर ( गुजरटेंभी) ता.करमाळा येथे आज महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग, सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेतून ” नाविन्यपूर्ण योजना” २०२३-२४ अंतर्गत उजनी जलाशयामध्ये मत्स्यबोटुकली संचयन कार्यक्रम अंतर्गत 50 लक्ष निधीचे मत्स्य बीज आज दि.11 मार्च रोजी करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उजनी धरणात सोडण्यात आले. यावेळी प्रादेशिक उपाआयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे मा.विजय शिखरे, सहाय्यक आयुक्त,मा.राजेश पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
या कार्यक्रमासाठी कंदर गावचे जेष्ठ नेते मा.नवनाथ मालक भांगे, सरपंच मा.मौलासाहेब मुलाणी, उपसरपंच मा.अमर भांगे,जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा.नंदकुमार नगरे,मा.पै.उमेश इंगळे,मा.अभिजीत भांगे,जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.अंकुश जाधव सर,मा.दत्ता चव्हाण, बाजार समितीचे संचालक मा.धनंजय मोरे,मा.सतीश माने, तालुका अध्यक्ष मा.सतीश कनिचे,मा.अतुल पाटोळे,मा.दिपक माने,कन्हेरगांवचे माजी सरपंच मा.दशरथ चव्हाण तसेच तालुक्यातून आलेले जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ बंधू, महिला भगिनी उपस्थित होते.
चौकट –
धरणावरती मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मत्स्य बांधवांकडून आमदार शिंदे यांचे आभार…
कित्येक वर्षांपूर्वी उजनी धरणामध्ये मत्स्य बोटूकलीचे संचयन करण्यात आलेले होते. कालांतराने ते संचयन करणे चे काम थांबलेले होते. ही बाब आमदार शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे निधीतून त्यासाठी 50 लक्ष निधी मंजूर करून घेतला व आज प्रत्यक्षात मत्स्यबोटूकलीचे संचयन धरणात करण्यात आले. यामुळे भविष्यकाळात मत्स्य व्यवसायासाठी चांगले दिवस राहतील, त्यामुळे सर्व मत्स्य बांधवांकडून आमदार शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
