आध्यात्मिककरमाळा

सरकार गणेशोत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी श्री दत्तात्रय भांडवलकर व उपाध्यक्षपदी श्री गणेश जाधव यांची निवड

करमाळा प्रतिनिधी श्री गणेशोत्सव आगमन सोहळा सन 2022-23 निमित्ताने “सरकार मित्र मंडळाची” बैठक घोलपनगर, करमाळा येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये श्री गणेशोत्सव स्थापना, विविध उपक्रम व भव्य-दिव्य मिरवणुक काढणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गत दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पडलेला खंड पाहता यावर्षी हा सोहळा धुमधडाक्यात साजरा होण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी श्री दत्तात्रय भांडवलकर व उपाध्यक्षपदी श्री गणेश जाधव यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी त्यांचा फेटा हार व श्रीफळ देउन सन्मान करण्यात आला.
यावेळी सरकार मित्र मंडळाचे सदस्य श्री. सचिन घोलप, श्री. सचिन गायकवाड, श्री. विजय लावंड, श्री. अमोल यादव, श्री. राहुल पवार, श्री. विजय घोलप, श्री. अरुण (काका) जगताप, श्री. स्वानंद वांगडे, श्री. विनय ननवरे, श्री. संतोष वारे, ॲड सुनील घोलप, श्री. शायर बागवान, श्री. जोतिराम लावंड, श्री. अमोल कांबळे (सर), श्री. विशाल गुळवे, श्री. अजित यादव, श्री. कविराज माने, श्री. साजिद बागवान, श्री. अशोक चव्हाण, श्री. चेतनशेठ किंगर, ॲड अमर शिंगाडे, श्री. असिर खान, श्री. सुहास माने, श्री. महेश दिवाण यासह मंडळाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group