महाराष्ट्र राज्य संघामध्ये आपले स्थान निश्चित कु.तन्वी युवराज भोसले हिची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड
.
केत्तूर, ( अभय माने) नुकतेच रोहा रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये उस्मानाबाद मुलींच्या सं घाने प्रथम क्रमांक संपादन केला. यामध्ये कु.तन्वी युवराज भोसले हिने उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्र राज्य संघामध्ये आपले स्थान निश्चित करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे.
कोलकाटा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून तिची निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोलकाटा ,हल्दिया येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतील उत्तुंग कामगिरीसाठी कु.तन्वीस शुभेच्छा दिल्या.
तन्वीही कुंभेज वि.का.से.सो.चे मा चेअरमन प्रवीण भोसले यांची ती पुतणी आहे.तिने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल कुंभेजचे सरपंच सिंधुताई गायकवाड, उपसरपंच संजय तोरमल, पं.स. करमाळा मा.उपसभापती, व अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त भारतभाऊ शिंदे पाटील, मा.सरपंच दादासाहेब चौगुले, गोकुळ काका शिंदे, ग्रा.पं सदस्य आण्णासाहेब साळुंके, चेअरमन महावीर साळुंके,गुरुदास सुर्वे, समाज कल्याण निरीक्षक उस्मानाबाद,कल्याणराव साळुंके, युवराज भोसले, नितीन भोसले, महादेव शिंदे, पैगंबर पठाण आदिनी अभिनंदन केले आहे.
