मानवता एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्यावतीने करमाळ्यात २४१ जणांचे रक्तदान
करमाळा प्रतिनिधी
मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा करमाळाच्यावतीने संत निरंकारी सत्संग भवन करमाळा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .या रक्तदान शिबीरामध्ये एकूण २४१ जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर झोनचे झोनल प्रमुख प .पू .श्री इंद्रपाल सिंहजी नागपाल महाराज , ज्ञानप्रचारक प. पू . श्री चांदभाई तांबोळी महाराज , युवानेते श्री शंभुराजे जगताप जी, पृथ्वीराज भैय्या पाटील जी, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री चंद्रकांत सरडे जी ,डॉ सुदर्शन झोळ जी , नगरसेविका सौ . स्वाती फंड जी, राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे तालुकाध्यक्ष श्री रविंद्र वळेकर जी , टेंभूर्णीचे ब्रँचमुखी प. आ. श्री अनिल पवार जी यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले . सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मंडळाच्या मानवतावादी कार्याचे कौतूक केले .
आतापर्यंत करमाळा शाखेने एकूण ४७४० युनिट रक्तसंकलन केले आहे . या शिबीरात रक्तसंकलनाचे उत्कृष्ट नियोजन सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर , दमाणी ब्लड बँक सोलापूर , रामभाई शहा रक्तपेढी बार्शी यांनी केले .
रक्तदात्यांना प्रेरीत करण्यासाठी गावोगावी स्थानिक प्रबंधक , सेवादल बंधु भगिनी व साधसंगतच्यावतीने जनजागृती करण्यात आली होती .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी प.आ . रमेश वारे जी , भैरु वळेकर जी , मुकुंद साळूंके जी ,डॉ . भाऊसाहेब सरडे जी , मनधीर शिंदे जी सर्व महिला व पुरुष सेवादल यांनी प्रयत्न केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प .आ श्री सुनिल शिंदे यांनी केले तर सर्वांचे सन्मानार्थ आभार करमाळा शाखेचे प्रमुख श्री पोपट थोरात यांनी मानले .