कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त 14ॲागस्ट रोजी रक्तदान आरोग्य शिबिर विविध कार्यक्रमांचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी कामगार नेते गोरगरिबाचे कैवारी हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषदचे सदस्य स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या 14 ऑगस्ट रोजी पुण्यतिथीनिमित्त नवव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे .यानिमित्ताने सकाळी नऊ ते चार या वेळेमध्ये हमाल पंचायत भवन पोथर नाका येथे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा तालुका हमाल पंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.
