Uncategorized

करमाळयातील बागल गटाचा 27 फेब्रुवारीला मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसह जाहिर प्रवेश

करमाळा प्रतिनिधी

करमाळ्यातील राजकारणात मोठी घडामोड झाली असुन करमाळ्याच्या राजकारणातील मोठा गट मानला जाणारा बागल गट उद्या २७ फेब्रुवारीला मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात हजर राहुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश पक्षप्रवेश करणार आहेत.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी मागील विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर शिवसेनेत आले. सध्या बागल गटाने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
करमाळा शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून बागल गट कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा सुरू होती.. आता भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने बागल गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group