Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

शेलगाव क येथील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा 105 रुग्णांनी घेतला लाभ


करमाळा प्रतिनिधी
गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा व शेलगाव क कृषी क्रांती शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेलगाव क येथे मोफत मोतीबिंदू शत्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शवून 105 रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.
या शिबिराचे उद्घाटन पाणी फाउंडेशन चे विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख, तालुका समन्वयक प्रतिक गुरव, गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे श्री किसन कांबळे , बुधराणी हॉस्पिटलचे डॉ. महंमद ठसरवाला, सरपंच प्रतिनिधी आत्माराम वीर, उपसरपंच लखन ढावरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या शिबिरात 50 टक्के सवलतीच्या दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले‌ याचा लाभ 45 रुग्णांनी घेतला ,तर 11 रुग्णांची निवड ही मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली .लवकरच या रुग्णांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शेलगाव क कृषी क्रांती गटाचे सदस्य नवनाथ शिंदे, मेजर शंकर शिंदे, अंकुश शिंदे, बापू माने, जितेंद्र वीर, तानाजी माने,सचीन वीर,अमर शिंदे यांनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group