Friday, April 25, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेशनगर करमाळा यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा

करमाळा प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ महाराज व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर चे पिठाधीश परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व आदरणीय युवासंत चंद्रकांत दादासाहेब यांच्या परवानगीने श्री दत्त जयंती अखंड जप नाम यज्ञ सप्ताह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र केमिस्ट भवन गणेश नगर करमाळा येथे दि.20/12/2023ते 27/12/2023 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.या सप्ताह मध्ये सामुदायिक गुरूचरित्र पारायण,प्रहर सेवा, गणेश याग, चंडी यांग, रुद्र याग, मल्हारी सप्तशती पठण, दुर्गा सप्तशती पठण, यांसारख्या विविध ग्रंथ पठण सेवा अखंड पुणे सुरू राहणार आहेत. प्रहर सेवेमध्ये दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत पठण, दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, दोन सेवेकरी विना वादन करून श्री स्वामी समर्थ मंत्र जप सेवा अखंड पणे करणार आहेत.आज पासून या सप्ताहास सुरूवात झाली आहे.करमाळा शहरातील पहिल्याच सामुदायिक श्री गुरुचरीत्र पारायणास आज सुरूवात झाली असून एकूण 56 सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.प्रहर सेवा देखील सुरू झाली आहे.तरी जास्तीत जास्त लोकांनी या सेवेमध्ये सहभाग घेऊन अतिउच्च कोटींची सेवा श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या चरणी रुजू करावी. आपली कोणतीही समस्या सोडविण्याचे सामर्थ्य या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गात असून आपल्या समस्येवरील अध्यात्मिक मार्गदर्शन साठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर करमाळा येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर यांच्या मार्फत करण्यात आले आहे. खूप कमी कालावधीत करमाळा परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाली असून हजारो सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाला जोडले गेले आहेत. समस्या अनुरूप मार्गदर्शन घेऊन समस्या सूटल्याचे अनुभव हजारो सेवेकरी घेत आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group