सुलभ पद्धतीने कुणबी दाखला मिळण्यासाठी कचेरी मध्ये दर्शनी भागावरती कोण कोणती कागदपत्रे लागतात याचा बोर्ड लावावा : राजाभाऊ कदम
करमाळा प्रतिनिधी: बहुजन संघर्ष सेनेचे करमाळा प्रतिनिधी बहुजन संघर्ष राजाभाऊ कदम व विविध गावचे सरपंच यांच्या समवेत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन
मराठा समाजाला कुणबी दाखले सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागतात याचा बोर्ड तहसील कचेरीच्या दर्शनी भागावरती लावावा .
कुणबी दाखले काढण्यासाठी पैसे घेणाऱ्या दलालांचा कायदेशीर बंदोबस्त करावा.
तहसीलदार प्रशासकीय कामानिमित्त फिरतीवर गेले असता तहसील कचेरीतील कर्मचारी स्वतःच्या टेबलला न थांबता बाहेर निघून गेलेले असतात त्यामुळे नागरिकांची कामे होत नाहीत याचा बंदोबस्त करावा.
पुरवठा विभागामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर ची संख्या वाढवावी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी रेशन कार्डची कामे दोन दोन चार चार महिने होत नाहीत लवकरात लवकर कामे व्हावीत रेशन कार्ड चे बारा अंकी नंबर व अन्नसुरक्षा योजनेमध्ये रेशन कार्ड समाविष्ट करण्यासाठी विभक्त रेशन कार्ड काढण्यासाठी नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली असते ही सर्व कामे लवकरात लवकर करावीत आशा मागण्या केल्या. तहसीलदार मॅडमनी सर्व मागण्या ऐकून घेऊन या सर्व समस्या सोडवल्या जातील असे सांगितले त्यावेळेस राजाभाऊ कदम म्हणाले सात-आठ महिन्यापासून करमाळा तहसील कचेरीतील विस्कटलेली घडी दुरुस्त करण्याचे तुमच्यापुढे मोठेे आव्हान आहे तहसीलदार मॅडम म्हणाल्या मी पहिल्या दिवसापासूनच विस्कटलेली घडी दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे यापुढे तहसील कचेरीतील सर्व कामे वेळेत होतील.
राजाभाऊ कदम यांनी करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनांच्या विषयावरतीही मॅडम यांनी दिल खुलास कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली
यावेळेस उपस्थित बहुजन संघर्षनेचे तालुकाध्यक्ष अंगद लांडगे, खातगावचे सरपंच अविनाश मोरे, गोयेगावचे चे सरपंच दादा गायकवाड, इंजिनीयर कोकरे ,लाला सुरवसे आदिजन उपस्थित होते .
