Uncategorized

केतुर गावामध्ये रस्ते खराब झाल्यामुळे बेकायदेशीर खडी वाळू मुरूम वाहतूक बंद करण्याची राजेंद्र खटके यांची ग्रामसभेत मागणी

करमाळा प्रतिनिधी : मौजे केत्तूर ता. करमाळा येथील ग्रामसभेत श्री. राजेंद्र रामचंद्र खटके रा. केल्लूर यांनी अर्ज दिला असून त्याच्या मते केत्तूर गावात मोठ्या प्रमाणात खड़ी वाहतूक मुरुम वाहतूक कुश वाहतूक पूर्णपणे ओव्हर लोड होत असून ती सर्व वाहतूक बेकायदेशीर होत आहे गावातील सार्वजीनिक रस्ते खरब झालेले आहेत तरी याबाबत मा. तहसीलदार साहेब करमाळा याला याबाबत ठराव देऊन पूर्तता करावी असे म्हटले आहे.
मौजे केल्लूर ता करमाळा जि सोलापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि २६/०८/२०२४ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता सरपंच मा.श्री. सचिन विठ्ठल वेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामंपचायत कार्यालयात खालील विषयावर विचार विनिमय करणेसाठी घेण्यात आली. ग्रामसभेच्या हजर सभासदाच्या सह्या ग्रामसभेच्या हजर रजिस्टरला आहेत. ग्रा.प हद्दीतील विना परवाना विना रॉयल्ठी जड वाहतूक होत असले बाबत
याबाबत ग्रामपंचायत ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली व मा तहसीलदर साहेच करमाळा याना उराव देऊन पुढील योग्य ती कार्यवाही करावी असे सर्वानुमते ठरले आहे: या वेळी सुचक श्री. मच्छिद्र सोपान चव्हाण यांनी अनुः श्री महावीर रामचद्र राऊत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.तरी केत्तुर गावातील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यामुळे बेकायदेशीर होणारी वाळू मुरूम खडी वाहतूक बंद करण्याची मागणी राजेंद्र खटके यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!