करमाळासोलापूर जिल्हा

एका रक्तदात्याने रक्तदान करणे म्हणजे एका व्यक्तीचा जीव वाचविणे :- आ.संजयमामा शिंदे.

करमाळा प्रतिनिधी. कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांचा जीवनपट म्हणजे करमाळा शहरासह तालुक्यामध्ये कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी आपले संपूर्ण जीवन त्यांनी खर्च केले. उपेक्षित वर्गाचा लोकनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आज त्यांची 6 वी. पुण्यतिथी असताना आपल्या देशा समोर कोरेाना सारखे उभे असलेले संकट त्याच बरोबर देशामध्ये रुग्णांना भासत असलेला रक्ताचा तुटवडा याची निकड लक्षात घेवून स्व्.आण्णांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून करमाळा शहरामध्ये भव्य् रक्तदान शिबीराचे आयोजन करुन या शिबिरामधून 169 रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्व्.सुभाष आण्णा सावंत यांचा समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवलेला आहे. या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे असे मत आ.संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.
करमाळा शहरातील हमाल पंचायत येथे स्व्.सुभाष आण्णा सावंत यांच्या 6 व्या पुण्यतिथी निमित्त् आयोजित रक्तदान शिबिरास त्यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
या शिबिराचे उद्घाटन डॉ.संजय कोग्रेकर, वैद्यकिय अधिक्षक अमोल डुकरे, डॉ.प्रशांत करंजकर, डॉ.राहुल कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे डॉ.भरत गायकवाड, डॉ.कपील हिंगमीरे यांनी रक्तसंकलन केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना टिफिन बॉक्स भेट देण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रक्तदान व अन्न्दान यांना विशेष महत्व आहे. विशेषत: अन्नदान करण्यासाठी अन्नदाते भरपूर मिळतात. मात्र रक्तदान करण्यासाठी रक्तदाते कमी प्रमाणात मिळतात. जो रक्तदान करतो तो रक्तदाता हा दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवितो त्यामुळे अन्नदानापेक्षा रक्तदान मोलाचे आहे. आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मी करमाळा तालुका हमाल पंचायतचे व छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे सर्व सदस्य् कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन करतो.
यावेळी करमाळयाचे तहसिलदार समीर माने यांनीपण या शिबिराला भेट देवून या शिबिराचे कौतुक केले.
यावेळी मकाई सह सा का चे चेअरमन दिग्विजय बागल, जगताप गटाचे शंभूराजे जगताप, संतोष वारे, नगरसेवक प्रशांत ढाळे, राजु आवाड, गोविंद किरवे महादेव फंड, डॉ.वसंतराव पुंडे, संचालक अशिष गायकवाड, संचालक शशिकांत केकान, सरपंच भोजराज सुरवसे, सरपंच गौतम ढाणे, कृ.उ.बा.समितीचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुळ, आजीनाथ नाईकनवरे, जि.प.माजी सदस्य उध्दव माळी, भगवान भोई, अॅड.राम नीळ, अॅड बळवंत राऊत, सचिन गायकवाड, फारुक जमादार, पत्रकार सर्व श्री सुनिल भोसले, आशपाक सय्य्द, अशोकराव नरसाळे, समाधान फरतडे, अलीम शेख, वैभव मुरुमकर, पिंटू मुरुमकर, लहू शिंदे, संतोष वाघमोडे, डॉ.मुरुमकर, डॉ.सुभाष शेंद्रे, झुंबर कावळे, शहाजी शिंगटे, दत्तात्रय नलवडे, सुरेश भोगल, चैतन्य् वारे, प्रा. दिपक सुरवसे, गणेश मुरुमकर, बाळासाहेब काळे ,दादासाहेब नवले, शरद पवार, मदनशेठ देवी, नामदेव शेगडे, सागर वाडेकर, विलास दळवी, मनोज गोडसे, निखिल पाटील, सुनील काळे यांनी या ठिकाणी भेट देवून रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी १६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी हमाल पंचायत व छ शिवाजी तरुण मंडळाचे सदस्य् चे विठ्ठल्आप्पा सावंत, हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड.राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत, सुनिल सावंत, पै. गणेश सावंत , डॉ.संकेत सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल् रासकर, शरद वाडेकर. सागर सामसे, बापु उबाळे, आकाश करकुटे , राजकुमार सुरवसे. विशाल रासकर , प्रशांत बागल, मार्तंड आप्पा सुरवसे, रामा कारंडे, बंडू मुसळे आदी जणांनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group