करमाळा

केरळमध्ये ज्ञानसभेचे  दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास  झोळ सर यांना निमंत्रण

करमाळा प्रतिनिधी : केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ज्ञानसभेचे आयोजन करण्यात आले असून दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांना कुलगुरूंच्या व तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शैक्षणिक शाखा असलेल्या ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’च्या वतीने केरळमधील येडापल्ली येथे राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’ चे केंद्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका आली असून ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत २७ जुलै रोजी शिक्षणातील भारतीय करण आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची व्यापक अंमलबजावणी या विषयावर बोलण्याची शक्यता आहे. विकसित भारतासाठी शिक्षण या विषयावर ही परिषद केंद्रित आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!